मुंबई : कोरोनाच्या या संकटामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले. बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान देखील वेळोवेळी गरजवंतांच्या मदतीला धावून आला आहे. यावेळी देखील सलमानने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील २५ हजार मजुरांना मदत करण्याची घोषणा केली आहे. २५ हजार कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३.७५ कोटी रुपये देऊन मदत करण्याचा निर्णय घेतला होता.
सलमान खानने त्याचे वचन पूर्ण करत सिने कामगारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. त्याने प्रत्येक कामगाराच्या खात्यात 1500 रुपये ट्रान्स्फर केले आहे. सुरवतीच्या लॉकडाऊनच्या काळात ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या संस्थेकडून जवळपास २ लाख गरजवंतांना अन्नधान्यचा पुरवठा करण्यात आला होता.
याशिवाय हजारो मजुरांना सलमान खानने आर्थिक मदतही दिली होती. गेल्यावर्षी सलमानने इंडस्ट्रीशी संबंधित गरजू लोकांना १५ कोटींची आर्थिक मदत केली होती. त्यावेळी त्याने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित २३ हजार लोकांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती.
नुकताच सलमान खानचा राधे चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘राधे’ चित्रपटातून होणारी सर्व कमाई कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच झी एंटरटेनमेन्ट आणि सलमान खान फिल्म्सनं दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- सलमानशी पंगा पडला महागात; केआरकेने मागितली माफी
- इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का ; जोस बटलर एकदिवसीय मालिकेतून बाहेर
- ‘मी आता स्वत: श्वास घेत आहे’; ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध दवेची कोरोनावर मात
- जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
