नागपूर : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपाचं आज राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन सुरू आहे.
नागपूरमध्येही भाजपने चक्का जाम आंदोलनाची तयारी केली आहे. पण, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या ओबीसी नेत्यांसोबत भाजपने काय केलं? असा बॅनरद्वारे सवाल केला आहे. यामुळे शहरात एकच राजकीय धुरळा उडाला आहे.
नागपूरच्या व्हेरायटी चौकात भाजपकडून चक्का जाम आंदोलन केले जात आहे. यावेळी उड्डाणपुलावर भाजपने चक्का जाम आंदोलनाचे मोठे बॅनर लावले होते. पण युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या बॅनरवर आणखीन एक बॅनर लावले. या बॅनरवर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे यांचे फोटो बॅनरवर लावून ‘भाजपने या ओबीसी नेत्यांसोबत काय केले?’ हा प्रश्न उपस्थित केला.
तसेच ‘जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बांनी’ असा मजकूरही लिहिला आहे. दरम्यान, काही वेळातच भाजप कार्यकर्त्याने पुलावर जाऊन हे बॅनर काढून टाकले. नंतर पोलिसांनी धाव घेऊन हे बॅनर जप्त केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट केले ब्लॉक, ट्विटरचे स्पष्टीकरण
- ‘सध्या स्वबळाचा विषय नाही, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ’, दिल्लीहून परतल्यावर पटोलेंच्या भूमिकेत बदल
- देशमुखांवर ईडीची कारवाई; ‘आम्ही बघून घेऊ!’, राऊतांचा भाजपाला इशारा
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
