🕒 1 min read
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा देऊन राज्यात खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाताच नरमाईची भूमिका घेतली. राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक परिस्थिती आणि गरज पाहून लढवण्यात येतील, अशी भूमिका त्यांनी शुक्रवारी मांडली.
एका वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘लोकसभेच्या निवडणुका २०२४ मध्ये आहेत. त्यामुळे आतापासून स्वबळाचा काही विषय नाही. काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल व महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत स्वबळाचा विषय नव्हता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय धोरण असावे याबद्दल चर्चा झाली. जि. प. निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे. लवकरच महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेसोबत आघाडीची गरज असेल तिथे आघाडी करू तसेच जिथे स्वबळावर गरजेचे असेल तिथे स्वतंत्र लढू’ असे मत पटोले यांनी व्यक्त केले.
पक्षश्रेष्ठींनी काढली हवा
दरम्यान, पटोले यांनी आपली भूमिका मांडण्यापूर्वीच काँग्रेस प्रदेश प्रभारी एच के पाटील यांनी स्वबळावर भाष्य केले होते. ‘आत्ता कोणत्याही निवडणूका नाहीत, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीवेळी ते पाहता येईल. तसेच जो काही निर्णय असेल तो पक्षश्रेष्ठी घेतील.’ असे वक्तव्य एच के पाटील यांनी केले. त्यामुळे पटोले यांच्या स्वबळाच्या भूमिकेची हवा निघुन गेली होती.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘पुढील सामन्यात स्थान मिळेल का?’ सॅम करनने केले ट्विट
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
