Share

‘…आम्ही एकत्र पुढे जाऊ’ ; पराभवानंतर कोहलीचे भावनात्मक ट्विट

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला. पराभवानंतर कोहलीने याचे कारणही सांगितले.

सामन्यानंतर कोहली म्हणाला की, पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाची लय बिघडली होती. ‘पहिला दिवस पावसाने वाहून गेला आणि जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा लय शोधणे कठीण होते. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या, जर पाऊसाचा खेळात व्यत्यय आला नसता तर आम्ही आणखी धावा करू शकलो असतो.’

दरम्यान, कर्णधार कोहलीने टीम इंडियासाठी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून कर्णधार कोहली आपल्या टीमचं मनोबल वाढवताना दिसत आहे. कोहलीने ट्विट करत लिहिले की, ‘भारतीय टीम फक्त टीम नाही तर एक परिवार आहे. आणि आम्ही एकत्र पुढे जाऊ’ अशा आशयाचे ट्विट यावेळी कोहलीने केले आहे. एक कर्णधार म्हणून आपली जबाबदारी जाणत कोहली या ट्विटच्या माध्यमातून भारतीय संघाला प्रोत्साहीत करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!