Share

इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या दोन दिवसात पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. मात्र या दौऱ्याआधी पाकिस्तानच्या संघासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षक युनूस खानने त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

येत्या २५ जुन रोजी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्याला रवाना होण्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक युनूस खानने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील वर्षी युनूस खानची फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती आगामी नोव्हेंबर २०२२ पर्यंत करण्यात आली होती. मात्र त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पुर्वतयारीवर परिणाम होणार आहे.

युनूस खानला पाकिस्तान संघाचा मुख्य फलंदाज म्हणून ओळखले जायचे. निवृत्तीनंतर त्यांच्या अनुभवाचा फायदा युवा खेळाडूंना व्हावा म्हणून त्याची फलंदाजी प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली होती. पाकिस्तानचा संघ आगामी इंग्लंड दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाकिस्तानचा संघ २ कसोटी सामने आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!