Share

देशात आज विक्रमी लसीकरण ; तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली आज लस

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. देशात आजपासून 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार झाली आहे. त्यानुसार आज पहिल्याच दिवशी विक्रमी 69 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिली.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केल्यापासून एका दिवसांत ७५ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीचा डोस देण्याचा हा सर्वोच्च आकडा आहे. 16 जानेवारीपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत देशात 28.7 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.

नवीन लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वयोगटातील नागरिक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी ही लस घेण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना CoWIN पोर्टलद्वारे अपॉईंटमेंट घेणे आवश्यक होते. मात्र या मोहिमेनुसार, 18 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत लस दिली जाईल. या मोठ्या लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल आणि राज्यांना काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. दरम्यान खासगी रुग्णालयात लस मिळण्यासाठी किंमत मोजावी लागेल.

केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी मोफत लसीकरण’ मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि युवकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तरच आपण कोरोनावर मत करू शकतो, असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!