🕒 1 min read
मुंबई : कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. यातील कलाकारांनी देखील लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. यांनी अविरतपणे लोकांना हसविण्याचे काम केले. कपिलची या शोमुळे नेहमीच चर्चा होत असते.
कपिल शर्मा हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेकदा त्याने त्याच्या कार्यक्रमाचे, कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. कपिलची मुलगी खूपच क्यूट आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतात. यावेळी नुकतेच कपिलने ‘फादर्स डे’ निमित्ताने सोशल मीडियावर पहिल्यांदाच मुलांसोबतचा फोटो शेअर केला होता.
https://www.instagram.com/p/CQWNauVgkeJ/?utm_source=ig_embed&ig_rid=48cdee4b-f6ae-4aa9-81df-6a4588095e20
कपिलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनायरा आणि त्रिशान या दोघांसोबतच फोटो शेअर केले आहे. हा फोटो शेअर करत ‘चाहत्यांच्या मागणीनंतर अनायरा आणि त्रिशान यांचा पहिल्यांदा एकत्र फोटो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. कपिल बऱ्याच वेळा अनायराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र मुलाच्या जन्मानंतर त्याने मुलगा त्रिशानसोबतचा पहिल्यांदाच फोटो शेअर केला आहे.
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा विवाह १२ डिसेंबर २०१८ रोजी झाला होता. त्यानंतर त्याला दुसरा मुलगा झाल्याची कपिलने गोड बातमी जाहीर केली होती, तेव्हा सोशल मीडियावर त्याला अनेकांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता त्याने दोन्ही मुलगी अनायरा आणि मुलगा त्रिशानचा शेअर केलेल्या फोटोवर देखील अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! तिसऱ्या दिवशी न्युझीलंड २ बाद १०१
- ‘जडेजा-अश्विनची जोडी टीम इंडियासाठी ठरणार गेम चेंजर’ ; दिग्गज खेळाडूचा दावा
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
