Share

‘मराठा आरक्षणावर केंद्राने तात्काळ तोडगा काढावा’ – संजय राऊत

Published On: 

मुंबई : कोल्हापूरमध्ये आज मराठा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाची हाक दिली होती .याच पार्श्वभूमीवरआज कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन आज पार पडले आहे. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात केली होती.

याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शिवसेना नेते आणि राजसभा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारडे ढकला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने तात्काळ त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी करतानाच आमच्याकडे चावी आहे, आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न उघडू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली, त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री यांना साकडे घातले आहे.

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची प्रमुख भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. मराठा आरक्षणाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हे सर्व शांतपणे आणि सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे,’ असे ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान , कोल्हापुरातील या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील मूक मोर्चाला आमदार, खासदारांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!