Share

सरकारच्या अडचणी वाढणार : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, ओबीसी आणि धनगर समाजही आक्रमक

Published On: 

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला. पावसाची तमा न करता हजारो कार्यकर्ते आंदोलनस्थळी हजेरी लावली आहे. पक्ष आणि संघटना विरहित या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाची संघटित शक्ती एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी उद्या अर्थात 16 जूनपासून मूक मोर्चांना सुरुवात होत असताना, तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  17 जून रोजी दुपारी 12 वाजता नाशकात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील धनगर आरक्षण हा मुद्दा देखील पेटू लागला आहे. धनगर आरक्षण समितीकडून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिवेशनामध्ये ठराव मांडून तो संमत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठराव मंजूर न केल्यास मुख्यमंत्र्यांना पंढपुरात येऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला आहे.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून या सर्व आंदोलनांमुळे राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. विविध समाज आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आक्रमक होत असून राज्यात सत्तेवर असणाऱ्या प्रमुख तीन पक्षातील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!