औरंगाबाद : शासनाने शहरातील विविध विकास कामांसाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे हा निधी किती टक्के खर्च झाला याची माहिती घेण्यासाठी राज्याचे विधानमंडळ समिती लवकरच महापालिकेत येणार आहे त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून फायलींची पूर्तता करण्यासाठी महापालिकेत लगबग सुरू आहे.
राज्य शासनातर्फे विविध विकास कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. अनेक वेळा या निधीचा वापर न होता तो पडून राहतो त्यामुळे निधीचा वापर किती टक्के झाला निधी पडून आहे का? याची चौकशी विधानमंडळ समितीकडून केली जाते ही समिती राज्यभर दौरा करणार असून महापालिकेतही येणार आहे. या समितीत १४ सदस्य दहा अधिकारी राहणार आहेत. असे कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी कळवले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभाग कामाला लागले आहेत समितीत आरंभी औरंगाबाद, ठाणे, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, नांदेड जिल्ह्यात जाणार आहे.
राज्य सरकारने महापालिकेला रस्त्यांसाठी १५२ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष बाब म्हणून ४८ कोटी, मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत २५ कोटी इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे तसेच जिल्हा नियोजन समितीकडून नऊ कोटी रुपये प्राप्त झाली आहेत. त्यापैकी किती निधी प्राप्त झाला, किती प्रमाणात कामे झाली इतर काही कामासाठी आलेला निधी वापराविना पडून आहे का याची पडताळणी प्रशासनातर्फे सुरू आहे. त्यामुळे धूळ खात पडलेल्या फाईली आता कपाटातून बाहेर निघत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना ब्रॅंड अँम्बेसेडर करा’, आ. धिरज देशमुखांच्या सूचना
- मुंबईकरांच्या सेवेत लोकल परतणार ? ; २ दिवसात निर्णय होणार
- लसींच्या पुरवठ्याबाबत भारत बायोटेकने घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार ?
- शेतकरी कुटुंबात ‘लक्ष्मी’चा जन्म ठरणार अधिक लाभदायक ! शासन देणार महत्वाची रोपे
- …अन् दिवस उजाडला ; चिमुकल्या वेदिकाला दिले तब्बल १६ कोटींचे इंजेक्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
