Share

सिद्धार्थ उद्यानात अवतरणार शक्तिमान, बाहुबली, स्पायडरमॅनसह बच्चे कंपनीचा लाडका छोटा भीम!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर मार्च २०२० मध्ये केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेने सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय बंद केले होते. तेव्हापासून म्हणजेच दीड वर्षे उलटल्यानंतरही प्राणिसंग्रहालय बंदच होते. दुसरी लाट ओसरल्यानंतर दिर्घ कालावधीनंतर ७ जूनपासून सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय उघडण्यात आले आहे. बालगोपाळांच्या आकर्षणात आता आणखीन भर पडणार आहे. उद्यानाच्या विविध भागात शक्तिमान, बाहुबली, स्पायडरमॅन, छोटा भीमसह विविध सुपरहिरोंच्या प्रतिकृती बसवल्या जाणार आहेत.

कोरोना प्रादुर्भावामुळे पंधरा महिन्यांपासून बंद असलेले सिध्दार्थ उद्यान आता सात जूनपासून सुरू झाले आहे. महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान म्हणजे बालगोपाळांच्या आकर्षणाचा विषय आहे. सुट्टीच्या दिवशी बच्चेकंपनी सिद्धार्थ उद्यानात येते आणि मनसोक्त आनंद लुटते. या ठिकाणी त्यांना खेळण्यासाठी विविध प्रकारच्या खेळण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील लॉन्स बच्चेकंपनींना धिंगाणा करण्यासाठी खुणावत असतात. आता आकर्षणांच्या या यादीत सुरहिरोंच्या प्रतिकृतींची भर पडणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रतिकृती तयार करुन घेण्यात आल्या आहेत. त्यात शक्तिमान, स्पायडरमॅन, बाहुबली, छोटा भीम, चाचा चौधरी, क्रिश, तात्या विंचू आदी सुपर हिरोंच्या प्रतिकृती असणार आहेत. उद्यानात वेगवेगळ्या ठिकाणी त्या लावल्या जातील, अशी माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. सध्या या प्रतिकृती कपड्यांमध्ये बांधून ठेवण्यात आल्या आहेत. सिध्दार्थ उद्यान पंधरा महिने बंद होते, या काळात उद्यानात सुधारणेची कामे करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून सुपर हिरोंच्या प्रतिकृती बसवण्याचे काम आता केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!