मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या दिवसापासुन वर्चस्व गाजवले होते. मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाने सावध फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आणि पराभव टाळला. मात्र या सामन्यात इंग्लंडच्या संघाने षटकांची गती कमी राखल्याने आयसीसीने इंग्लंडच्या संघावर कारवाई केली आहे. या कारवाईत आयसीसीने खेळाडुंच्या मानधनातील ४० टक्के रक्कम दंड ठोठावला आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी ही कारवाई केली आहे.
निर्धारीत वेळेच्या आत इंग्लंडच्या संघाला यश आले नाही. इंग्लंडच्या संघाने निर्धारित वेळेच्या आत २ षटके उशीरा टाकली होती. त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने त्यांची चुक मान्य केल्यामुळे याबाबत अधिकृत सुनावणी होणार नाही. या कसोटीच्या पाचव्या दिवशी न्युझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. पाचव्या दिवसाअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ बाद १७० धावा करत हा सामना अनिर्णित राखला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुशांत प्रमाणे मोहितचाही मृत्यु होऊ शकतो’, चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल
- ‘ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व ओबीसी संघटनांना एकत्र घेऊन आंदोलने करणार’
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
