Share

‘पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी उभे राहू; संभाजीराजे तर आमचे राजे आहेत’

Published On: 

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवराज्याभिषेक दिनी मराठा आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसर येत्या १६ तारखेला कोल्हापुरातून मराठा मोर्चा सुरु होणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना त्यांना पाठींबा देखील दिला आहे. उद्या शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं तरी आम्ही त्यांच्याही पाठी उभं राहू, संभाजीराजे तर आमचे राजे आहेत, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘संभाजीराजेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करत आहोत. मराठा आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर भाजप स्वत:चा झेंडा न घेता या आंदोलनात उतरेल हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि तात्काळ सवलती मिळून देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठी आम्ही उभे राहू. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी आम्ही उभे राहू. महाराज तर आमचे नेते आहेत. आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!