मुंबई : भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचली आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.
टीम इंडियाला लंडनमध्ये पोहचल्यानंतर ‘साऊथम्पटन येथील एजेज बाऊल या स्टेडियमच्या शेजारील हिल्टन पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागले. तीन दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणा नंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी शनिवारी वेगवेगळ्या वेळी जिम आणि मुख्य मैदानात ट्रेनिंग सुरू केली. आयसोलेशनच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंना अद्यापही एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही. त्यामुळे सर्व खेळाडूंनी वेगवेगळ्या वेळी मैदानात व्यायाम केला. खेळाडूंना त्यांच्या रुममध्ये व्यायाम करण्याचे साहित्य देखील देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- आगरकरचा ‘हा’ सल्ला विराटला न पटणारा
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
- उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
