Share

माझी वसुंधरा अभियानात हिंगोली नगर पालिकेचा राज्यात पहिला क्रमांक

Published On: 

हिंगोली: राज्यशासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी झालेल्या २२२ नगरपालिकेतून हिंगोली नगरपालिकेने राज्यातून पहिला क्रमांक मिळवला आहे. आज या पुरस्काराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आलं. या अभियानात पृथ्वी, जल, वायू या पैकी एका घटकावर काम करून शहराचा चेहरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले होते. हिंगोली पालिकेने पृथ्वी या घटकावर गेल्या वर्षभरात ५ हजार झाडे लाऊन त्याचं संगोपन केलं आहे.

जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र कोरोनाचे नियम पाळून सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने वृक्षारोपण तसेच अनेक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. गेल्या दशकात ज्या देशांमध्ये वनक्षेत्र वाढला आहे अशा देशांमध्ये भारताचा देखील समावेश झाला आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे, ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलत होते. गेल्या सहा वर्षात वन आणि वृक्ष क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे या वेळी जावडेकर यांनी सांगितलं.

पर्यावरण दिनानिमित्त शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते ‘मियावाकी’ पध्दतीने वृक्ष लागवड करुन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. मियावाकी पध्दतीने २१ हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. असेच प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन वृक्ष लागवडीचे काम करावे असे आवाहन देखील या वेळी करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!