ठाणे : सेलिब्रेटी तरुणीने कोविड सेंटरची कर्मचारी असल्याचे ओळखपत्र मिळवून कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रकरण ठाणे शहरात चांगलेच गाजत आहे.या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सर्व स्तरातून टीकेचा सूर उमटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची ठाणे महापालिकेच्या आरोग्य उपायुक्त यांच्या समिती मार्फतीने चौकशी करण्याचे तसेच यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.
सध्या लसींचा तुटवडा असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले आहे. असे असतानाही ठाणे महानगर पालीकेच्या पार्किग प्लाझा लसीकरण केंद्रात एका सेलिब्रिटी तरुणीने कोविड सेंटरची सुपरवायझर असल्याचे भासवून लस घेतल्याचे उघड झाले होते. या प्रकरणावरुन आता मनसेने देखील गंभीर आरोप केले आहेत.
बनावट आयडी कार्ड प्रकरणी त्या कंपनीवर कारवाई होणार नाही, कारण या कंपनीमागे मुंबईतील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोप मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. याच ओम साई आरोग्य केअर कंपनीने गेल्या वेळी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दीड लाख रुपये घेऊन बेड दिला होता, तेव्हा देखील डॉक्टरांवर कारवाई झाली, मात्र या कंपनीवर झाली नाही, आताही तेच होते आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या अभिनेत्री कंपनीच्या मालकाच्या मैत्रिणी नाहीत, त्या शिवसेना नेत्याच्या मैत्रिणी आहेत, असाही आरोप जाधव यांनी केला. येत्या काळात ठाणे पालिकेत कोविडचे अनेक घोटाळे उघडकीस येणार आहे, असा दावाही त्यांनी केला. जाधव यांच्या या आरोपानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे; नारायण राणेंची मागणी
- ‘तुम्हीच ओबीसींचे मसिहा आहात, असे भासवू नका’, मंत्री वडेट्टीवारांचा भाजपला टोला
- ओबीसी आरक्षणासाठीच्या भाजपच्या आक्रोश आंदोलनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास कोरोनाचे हे संकट नष्ट होईल’
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
