🕒 1 min read
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) -14 चा दुसरा भाग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये खेळला जाईल. अनेक परदेशी खेळाडू स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्याची शक्यता नाही. यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील खेळाडूंचा देखील समावेश आहे. मात्र, परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळण्यासाठी बीसीसीआय तयार करेल, असा फ्रेंचायझींना विश्वास आहे.
आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर समोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळणार नाहीत असं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे केकेआरचा कॅप्टन इयन मॉर्गन उर्वरित आयपीएल सामने खेंनाई नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता केकेआर मॅनेजमेंटवर पुन्हा एकदा कॅप्टन शोधण्याची वेळ आली आहे.
आयपीएल 2018 चा सिझन सुरु होण्यापूर्वी दिनेश कार्तिककडे केकेआरचं नेतृत्त्व सोपवण्यात आले होते. मागील आयपीएल सिझनमध्ये बॅटींगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्तिकनं कॅप्टनसीचा राजीनामा दिला आणि मॉर्गन कॅप्टन बनला. आता गरज पडली तर पुन्हा एकदा कॅप्टन होण्याची तयारी कार्तिकनं दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे; नारायण राणेंची मागणी
- संभाजीराजेंची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत – राणे
- हिजाब घातल्याने खिल्ली उडवणाऱ्या युझरला सना खानने दिले सडेतोड उत्तर
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’

