पुणे – राज्यसभा सदस्य संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतानाच त्यांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी समाजातील विभागवार प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. आता शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. ‘तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरून घोषित करेन’, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी महत्त्वाचे विधान केले. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा सवाल राणे यांनी केला. संभाजीराजे मराठा समाजाबाबत जे काही योग्य काम करतील त्याला पाठिंबा असेल, असेही राणे म्हणाले.
`रयतेने त्यांच्याकडे जायचे तर, हेच रयतेकडे जातात. त्यांच्या मागे किंवा आजूबाजूला कोणी नसते. समाजालाही ते राजे वाटत नाहीत. भाजपने स्वतःहून त्यांना खासदारकी दिली. परंतु, आता तिची मुदत संपत आल्यामुळे त्यांच्या आता ते अशा भेटीगाठी करीत आहेत,’असे राणे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे हे शिवराज्यभिषेकदिनी रायगडावर आंदोलन करणार आहेत, असे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर राणे म्हणाले, ‘‘रायगडावर आंदोलन करून काय उपयोग, तेथे कोण आहे. त्यांची दखल समाजही घेत नाही म्हणून रायगडावर जाण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.’
राणे म्हणाले, ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. मात्र, रायगडावर कोण आहेत हो? आंदोलन हे नेहमी लोकांमध्ये करावं. पण खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही अशी देखील टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा
- सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे, गिरीश महाजनांचा हल्लाबोल
- हिजाब घातल्याने खिल्ली उडवणाऱ्या युझरला सना खानने दिले सडेतोड उत्तर
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
- ‘तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली’

