🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.
दरम्यान सुनील गावस्कर यांनी अफ्रिकेचा खेळाडू ए बी डिव्हिलियर्स याची प्रशंसा केली आहे. टी 20 मध्ये सर्वात उत्तम फलंदाज कोण आहे यासंदर्भात सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते रोहित शर्मा किंवा विराट कोहली नाही तर आणखी एक दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू ए बी डिव्हिलियर्स हा सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
‘डिव्हिलियर्स प्रत्येक शॉट खेळतो. तो जेव्हा शॉट्स खेळतो ते खरंच पाहण्यासारखे असतात. तो फलंदाजी करताना मला पाहायला आवडतं.’ असंही सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. सुनील गावस्कर म्हणाले, ‘मला माहित आहे की माझ्या काळात बरेच लोक खेळत असत, टी -20 फॉर्मेटवर खूष नाहीत पण मला तो आवडतो. तीन तासांच्या सामन्याचा निकालही लवकर येतो त्यासाठी मला तो आवडतो असं गावस्कर म्हंटले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा
- सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे, गिरीश महाजनांचा हल्लाबोल
- हिजाब घातल्याने खिल्ली उडवणाऱ्या युझरला सना खानने दिले सडेतोड उत्तर
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
- अभिनेत्री दिशा पटानीने कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट

