Share

अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  : मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म १९४७  साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी नाटकांमधून अभिनयसृष्टीत पदार्पण केलं. तसेच काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत. अशोक सराफ यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर गेली तीन दशकं प्रेक्षकांना हसवलं. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी चांगली प्रसिद्ध होती. या जोडीने प्रत्येकाच्या मनात एक स्थान निर्माण केल. आज अशोक सराफ यांचा वाढदिवस…

गेले अनेक वर्ष कलाविश्वामध्ये वावर असणाऱ्या अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये सारेच जण ‘मामा’ या टोपण नावानं हाक मारतात.  नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास करत असतांनाच त्यांना ‘मामा’ हे नाव पडलं. त्याचं हे नाव पडण्यामागेदेखील रंजक किस्सा आहे. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो अनेक वेळा सेटवर त्याच्या मुलीला घेऊन येत असते. त्यावेळी ती लहान मुलगी सतत अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून हे कोण? असा प्रश्न आपल्या वडिलांना विचारत असे. त्यावेळी प्रकाशने तिला हे अशोक मामा असून तू त्यांना ‘अशोक मामा’ म्हणत जा असं सांगितलं. त्यानंतर त्या मुलीच्या निमित्तानं सेटवरील सर्वच जण त्यांना मामा अशी हाक मारु लागले. पुढे मनोरंजनसृष्टीतील प्रत्येक जण त्यांना मामा अशीच हाक मारु लागलं.

अशोक सराफ यांचे बनवाबनवी, गंमत जंमत, धुमधडाका, एक डाव भुताचा, नवरी मिळे नवऱ्याला असे कित्येक चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात. कोयला, करन अर्जुन, धूम २, सिंघम यासारख्या सुपरहीट हिंदी चित्रपटाही त्यांनी आपली भुमिका उत्तम निभावली आहे. तर ‘हम पाच’ या हिंदी मालिकेमधून त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!