🕒 1 min read
मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याअगोदर न्युझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. २ जुनपासुन या मालिकेतील पहिली कसोटी सुरु होणार आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत न्युझीलंड संघाचा प्रमुख गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट खेळणार नाही अशी माहिती सुरु आहे.
या महिन्यात भारत आणि न्युझीलंड संघाला १८ ते २२ जुन दरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीनयशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्याआधी न्युझीलंडच्या संघाला इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेत न्युझीलंड संघाचा प्रमुख गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट खेळणार नाही. बोल्ट थेट भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार अशी माहिती. न्युझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी ही माहिती दिली आहे. मात्र दुसऱ्या कसोटीत तो दिसु शकतो
आगामी डब्लुटीसी सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड कसुन तयारी करत आहे. ट्रेन्ट बोल्ट हा न्युझीलंड संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. बोल्टने ७१ कसोटी सामने खेळताना २८१ गडी बाद केले आहे. तर एकदिवसीय मध्ये ९३ सामन्यात १६९ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर ३४ टी -२० सामन्यात ४६ गडी बाद केले आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडुन खेळत असतो.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट सोबत अनुष्का-वामिका जाणार इंग्लंड दौऱ्यावर ?
- …तर अंतिम सामन्यात रोहित शर्माचं दुहेरी शतक समजा ; पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी
- दिलासादायक! राज्यात आज ३५,९४९ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी
- रस्ता रूंदीकरण प्रश्नी आ. सतीश चव्हाण यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे


