Share

‘मग तो अंडी कशी खातो?’, नेटकऱ्यांकडून विराट ट्रोल ; टीकाकारांना दिले सडेतोड प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा दिग्गज फलंदाज म्हणून जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कोहलीने टीम इंडियामधील फिटनेसची संकल्पना विराटने बदलली आहे. तसेच कर्णधार कोहलीला टीममधील सगळ्या खेळाडूंना फिट बघायचे आहे. त्यामुळे कोहलीच्या चाहत्यांना देखील त्याचा आहाराविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.

कोहलीच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे त्याने स्वतः उघड केले. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक प्रश्नोत्तर सत्र ठेवले होते, ज्यात त्याने आपल्या आहाराविषयी सांगितले होते.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी सर्व खेळाडू आपला कॉरंटाइन कालावधी पूर्ण करत आहेत. या सत्रादरम्यान एका चाहत्याने कोहलीला त्याच्या आहाराबद्दल विचारले. यावर कोहली म्हणाला, पाले भाज्या, अंडी, दोन कप कॉफी, मसूर, टेंगरीन, पालक, डोसा पण सर्व संतुलित प्रमाणात. असे सांगितल्यानंतर त्याला ट्रोल करायला सुरुवात झाली.

विराट स्वत:ला विगन सांगतो, मग तो अंडी कशी खातो? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला. चाहत्यांच्या या ट्रोलिंगवर विराट चांगलाच संतापला आणि त्याने प्रत्युत्तरही दिले. मी विगन असल्याचा कधीही दावा केला नाही, पण मी शाकाहारी होण्याबाबत बोललो आहे. दीर्घ श्वास घ्या आणि भाज्या खा (इच्छा असेल तर) असे विराटने ट्विटमध्ये म्हटले आहे. विराटच्या या ट्विटवर चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. जे लोक आहारात मांस व दुग्धजन्य पदार्थ वापरत नाहीत, त्यांना वीगन म्हणतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!