Share

लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी आता शरद पवार इन ऍक्शन; सीरमशी संवाद साधणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, आता तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारने देखील लसीकरणासाठी हालचाली सुरु केल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील राज्यातील लसीकरणासाठी पुढाकार घेणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली आहे.

शरद पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर ही पहिलीच बैठक असल्याने अनेकांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. या बैठकीला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांच्यासह इतर मंत्री व नेते देखील उपस्थित होते. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘बैठकीत सर्व नेत्यांनी आग्रह केल्यानंतर शरद पवार हे लसींच्या पुरवठ्यासाठी सीरमशी संवाद साधणार आहेत. यामुळे तुटवडा कमी होऊन अधिकाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध होण्यास मदत होईल.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!