Share

चंद्रकांतदादांना माझ्या लग्नाची घाई का ? आदित्य ठाकरेंच चोख प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून टीका करताना दिसून येत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे राज्यात काहीही समस्या निर्माण झाली की राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्रावर ढकलून मोकळे होते असा आरोप भाजपकडून सातत्याने होत असतो.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देखील राज्य आपली जबाबदारी केंद्रावर ढकलत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. ”मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सारखं केंद्राला जबाबदार धरणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची गत अशी झालीय की उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे दिल्लाला सांगतील की तुम्ही तिथून बघा मग आम्हाला कळवा”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

यावर आता खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत चंद्रकांत पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या लग्नाची इतकी काय घाई आहे? त्यावर मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलेन. सध्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री चांगला संवाद ठेवत आहेत. वातावरण चांगले ठेवावे आणि संकटकाळात राजकारण नको,’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!