🕒 1 min read
पैठण: जुन्या पैठण भागातील जामा मस्जिद परिसरातील पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला जलकुंभ हा पूर्णपणे जीर्ण झाला असून हा जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. ही जुनी पाण्याची टाकी मध्यवस्तीत असल्याने दुर्घटना घडल्यास मनुष्यहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही जलकुंभाच्या बांधकामासाठी दोन वर्षांपूर्वी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून कोट्यवधी निधी मंजूर झाला कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. मात्र, अजूनही काम पूर्ण न झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शहरात पाणी टंचाईचा मुद्दा ऐरणीवर आल्याने राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी लक्ष घातले असून सोमवारी (दि. ३१) जामा मस्जिद जवळील जलकुंभ व नगरपरिषद कार्यालया समोर जून्या मोडकळीस आलेल्या इमारतीची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय पैठण शहरात चर्चेचा विषय झाल्यानंतर या बाबीची गंभीर दखल घेऊन पैठणचे आमदार तथा मंत्री भुमरे यांनी अचानक जीर्ण झालेल्या जलकुंभास भेट दिली. यामुळे पैठण नगरपरिषद प्रशासनातील कर्मचार्यांची धांदल उडाली. या वेळी मंत्री संदीपान भुमरे यांनी नगर परिषदेच्या कर्मचार्यांना चांगलेच धार्यावर धरले.
४ जून रोजी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. जामा मस्जिद परिसरातील जलकुंभाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार झालेला असून जागा हस्तांतरण तसेच जुन्या तहसीलच्या जागी नवीन जलकुंभ उभारण्याबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि.४) तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याची सुचना मंत्री भुमरे यांनी जिल्हा प्रशासनाला केली.
महत्त्वाच्या बातम्या
- बारावीच्या परीक्षा रद्द करा ; अरविंद केजरीवाल यांची नरेंद्र मोदींकडे मागणी
- ‘ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी जबाबदारी पार पाडावी’
- अँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ
- राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत, उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी
- परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार, आ. दानवेंच्या सूचनेवर मनपा आयुक्तांची ग्वाही!

