🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर यंदा ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने गेलं असलं तरी कोकणातील गावांसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्येधडकलं होतं.
या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी गुजरातला मदत केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींनी टीकास्त्र सोडलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मोदींवर नाराजी व्यक्त केलीये. ‘केंद्रावर टीका करायची तेव्हा सडकून केली. ज्यावेळी चांगल्या होताना दिसल्या तेव्हा अभिनंदनाचे ट्विटही केले. मग ३७० कलम असो किवां राम मंदिराचा विषय असो. जे चुकीचं आहे चूक आणि योग्य ते योग्य सांगण्याची गरज आहे. आपल्याकडे वादळ आल्यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी गुजरातला गेले याचं वाईट वाटलं. गुजरातलाही नुकसान झालंच, पण तिथे त्यांनी जे केलं ते गोव्यात, महाराष्ट्रातही झालं असतं तर आनंद झाला असता. ते आमचे, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे असं डावं, उजवं करुन चालणार नाही,’ असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोन कोटी दोन लाख रुपये खर्च करुन औरंगाबाद मनपा करणार ७ हजार पलंगाची खरेदी
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : ग्रामपंचायती ते जिल्हा परिषदांमध्ये ६ जून रोजी साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’
- डब्लुटीसीच्या फायनलमध्ये ‘या’ कारणामुळे न्युझीलंड भारतीय संघाला भारी पडु शकतो: दिलीप वेगंसकर
- पापणी लवण्याआधी धोनीप्रमाणे क्षणात त्याने केले यष्टीचित; व्हिडीओ व्हायरल
- काही जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता तर ‘या’ जिल्ह्याच्या सीमा आता १५ जूनपर्यंत बंद !

