🕒 1 min read
पुणे – गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून टीका करताना दिसून येत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे राज्यात काहीही समस्या निर्माण झाली की राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्रावर ढकलून मोकळे होते असा आरोप भाजपकडून सातत्याने होत असतो.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देखील राज्य आपली जबाबदारी केंद्रवर ढकलत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. ”मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सारखं केंद्राला जबाबदार धरणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची गत अशी झालीय की उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे दिल्लाला सांगतील की तुम्ही तिथून बघा मग आम्हाला कळवा”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
‘ओबीसी आरक्षण असो किंवा मग मराठा आरक्षण यावरुन सारखं केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या सरकारमध्ये उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायचं झालं तरी हे दिल्लीला सांगतील. तुम्हीच तिथं आधी बघा मग आम्हाला सांगा’,असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच फडणविसांनी घेतली भेट; राष्ट्रवादीची सारवासारव
- ‘मुल्क से बढकर कुछ भी नही’ त्या प्रकरणावर मितालीने सोडले मौन

