मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान शनीवारी २९ मे रोजी बीसीसीआयने स्पर्धेतील उर्वरीत सामन्याची घोषणा करुन सर्व चर्चांना पुर्णविराम दिला.
मात्र, बीसीसीआयने ज्या काळात उर्वरीत आयपीएल स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. त्याच काळात वेस्ट इंडिज येथे कॅरेबीयन प्रिमीअर लीग ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. सीपीएलचा अंतिम सामना हा १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. आणि जर आयपीएल स्पर्धा जर १९ सप्टेंबरच्या आधी सुरु झाली तर या स्पर्धेतील सहभागी विदेशी खेळाडू हे आयपीएलमध्ये सहभाग नोंदवू शकणार नाहीत. यावर उपाय शोधण्यासाठी बीसीसीआय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत आहे. यादरम्यान सीपीएल स्पर्धा निर्धरीत वेळापत्रकाच्या आधीच संपवली जाऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू आणि कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा विश्वासू सहकारी सुरेश रैना हा उर्वरित आयपीएल सामने खेळणार आहे. याबाबत रैनाने ट्विट करून सांगितले आहे. सुरेश रैना हा चेन्नईचा अगदी पहिल्या सिझनपासूनचा खेळाडू आहे. आयपीएल चेन्नईकडून सर्वात जास्त रन रैनानेच काढले आहेत.
- काळी जादू, काळी विद्या माहीत होती मात्र आता काळा फंगस आलाय – उद्धव ठाकरे
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- मोठी बातमी : तुमच्या शहरात/जिल्ह्यात कोणते नवे नियम ? राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही, त्यात तिसरी लाट आली तर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
