🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगितीनंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमिवर इंग्लंडच्या रणनीतीवर सुनील गावसकरांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
यावर्षी सुरुवातीला इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली होती. या दौऱ्यात अहमदाबाद येथील खेळपट्टीवरुन चांगलाच वाद उभा राहीला होता. इंग्लंडच्या खेळाडूंनी अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडीअमच्या खेळपट्टीवर टिका केली होती. याच पार्श्वभूमिवर आगामी मालिकेत इंग्लंड संघाने जर वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी तयार केली. तर त्याचा फायदा भारतालाही होऊ शकतो असे भारताचे माजी क्रिकेटपटु सुनील गावसकर यांनी म्हणले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, ‘भारतात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जर इंग्लंडने वेगवान गोलंदाजाना मदत करणारी खेळपट्टी तयार केली, त भारतीय संघ यासाठी तयार असेल कारण भारतीय संघातही जागतीक दर्जाचे गोलंदाज आहे. जे इंग्लंडच्या फलंदाजाला अडचणीत आणू शकतात.’ भारताला अडचणीत टाकण्यासाठी इंग्लंडचा संघ खेळपट्टीवर गवताचा वापर करणार असेल तर ही इंग्लंडसाठी चिंतेची बाब असणार आहे. असे गावसकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- काळी जादू, काळी विद्या माहीत होती मात्र आता काळा फंगस आलाय – उद्धव ठाकरे
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- मोठी बातमी : तुमच्या शहरात/जिल्ह्यात कोणते नवे नियम ? राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही, त्यात तिसरी लाट आली तर…’


