मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कहर माजवला आहे. यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हा १ जून पर्यंत वाढवण्यात आला होता. आता रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी स्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे सरसकट लॉकडाऊन न हटवता निर्बंध कायम राहणार असल्याची शक्यता विविध मंत्र्यांनी वर्तवली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासह तिसरी लाट येऊच नये, यासाठी नागरिकांनी निर्बंधांच पालन करावं असं आवाहन केलं आहे. त्यांनी धोका समजावून सांगतानाच म्युकरमायकोसिस(बुरशीच्या रोगाचा प्रकार) बाबत देखील चिंता व्यक्त केली.
‘इतके दिवस आपल्याला काळी जादू, काळी विद्या माहीत होती मात्र आता काळा फंगस आलाय. म्युकरमायकोसिसचे राज्यात तीन हजार रुग्ण आहेत. या विरोधात लढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- मोठी बातमी : तुमच्या शहरात/जिल्ह्यात कोणते नवे नियम ? राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही, त्यात तिसरी लाट आली तर…’
- मराठा आरक्षण : पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून काम करू – अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
