Share

छपाईच्या पलीकडं ‘वसुली सरकार’ला काहीही सुचत नाही; भाजप आमदाराची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

माळशिरस : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि पदोन्नती आरक्षणावरून राज्य सरकारची कोंडी झाली असतानाच त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

याच मुद्द्यावरून भाजप आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘महाराष्ट्रातल्या निष्क्रिय सरकार मुळे मराठा आरक्षण रद्द झालं, SC -ST च पदोन्नती मधील आरक्षण रद्द झालं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत OBC ला मिळणाऱ्या राखीव जागेच आरक्षण रद्द झालं. छपाई च्या पलीकडं यांना काहीही सुचत नाही. वसुली सरकार !,’ अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने अजीबात गांभीर्य दाखविले नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!