मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेसने त्यावर सडकून टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मोडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा नव्हे तर विखाराचा राष्ट्रीय अजेंडा राबवत असल्याची जळजळीत टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मोदी आणि अमित शाह यांचा कारभार दडपशाहीचा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करुन मोदींनी दंडुकेशाही राबवली. बहुमत नसताना कायदा मंजूर केला आणि हिंदू-मुस्लिम वाद उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलावामतील शहिदांचा राजकीय वापर केला. मात्र, गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांचा बळी जाऊनही पंतप्रधान मोदी शांत राहिले. देशाच्या गेल्या 45 वर्षाच्या इतिहासात कधीही अशी घटना घडली नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
तसचे ‘पंतप्रधान मोदी यांच्याच अहंकारामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली. कोरोना सुरु होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर निच्चांकी होता. सध्याच्या घडीला भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशपेक्षाही कमी आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली पंतप्रधान मोदी यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करुन त्यांची वाट लावली,’ अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, आज काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. नाशिक येथे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महसलू मंत्री बाळासाहेभ थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मोदी सरकारवर भाजपवर टीका केली. भाजपनं सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, कोरोना स्थितीवरुन थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाआघाडी सरकार दलित विरोधी, रिपाइं १ जूनपासून करणार राज्यभर आंदोलन – आठवले
- मान्सून लांबणीवर ? केरळात १ ऐवजी ३ जूनला दाखल होणार, तर राज्यात मान्सून पूर्व पावसाचा इशारा !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडलेत; भाजपचा प्रहार
- कोहली आणि गब्बरसोबत क्रिकेट खेळणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला होतोय पश्चाताप


