Share

दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Published On: 

🕒 1 min read

जालना : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने नेमलेल्या देवताळे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली होती. महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. महिलांच्या दीर्घ दारूबंदी आंदोलनाने हा निर्णय घेण्यात आला पण दारूबंदी उठवण्याचा निर्णयाने दारू विरोधी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिलामध्ये नैराश्य पसरले आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले, चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचे कारण तेथे अवैध दारू वाढली हे देण्यात आले आहे. असे कारण देणे हे सरकारने स्वतःच्याच अपयशाची कबुली देणे आहे जर अवैध दारू वाढली तर ती रोखण्याचा प्रयत्न करणे हा त्याच्या वरचा उपाय असू शकतो.

वास्तविक तिथे पकडली जात असलेली अवैध दारू ही दारूबंदी यशस्वी होते आहे असा त्याचा अर्थ होता. पण पालकमंत्रीच दारूविक्रेत्यांच्या बाजूचे असल्याने दारूबंदी ला बदनाम केले गेले. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर सरकारने तो कायदा अधिक कडक केला. इतर गुन्ह्यांमध्ये सरकार ते गुन्हे कमी व्हावे म्हणून त्यातील कायदे अधिकाधिक कठोर करत जाते. त्याप्रमाणे अवैध दारूच्या संदर्भातील कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. ते केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती.

राजकारण आणि अर्थकारण याच्या पलीकडे बघून कठोर भूमिका घ्यावी व चंद्रपूरची दारूबंदी पुन्हा एकदा अमलात आणावी. आपण हा निर्णय न बदलल्यास महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील सर्व कार्यकर्ते आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशारा हेरंब कुलकर्णी, वसुधा सरदार, पारोमिता गोस्वामी, अविनाश पाटील, वर्षा विलास, महेश पवार, तृप्ती देसाई, विजय सिद्धेवार, रंजना गवांदे, डॉ. अजित मगदुम, प्रेमलता सोनूने,  सुरेश माने, तुलसीदास भोईटे, अमोल मडामे, बिसमिल्ला सय्यद, शिवाजी तायडे आदींनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!