🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या आयपीएल आणि टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे.
दरम्यान गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) समोर एक गोंधळ निर्माण केला आहे. आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआयने असा गेम खेळला कि ज्यामुळे आयसीसीला देखील तो स्वीकारावा लागेल. बीसीसीआयने घोषित केले की, कोरोनामुळे आयपीएलचे उर्वरित सामने युएईमध्ये खेळले जातील. आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळले जातील. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 25 दिवसांच्या कालावधीत होतील. त्यानंतर भारतातच टी -20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कोरोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागली होती. पण बीसीसीआयने त्यावर तोडगा काढला.
आयपीएलचे 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन मैदानावर खेळले जातील. जर तीन मैदानावर 31 सामने खेळले गेले तर युएईमध्ये टी-20 विश्वचषक 2021 चे आयोजन करणे शक्य होणार नाही, कारण या मेगा स्पर्धेत 45 सामने खेळले जातील. आयपीएलच्या 31 सामने जूनमध्ये आणि पीएसएलचे 20 सामने होणार आहेत.
अशा परिस्थितीत, युएईच्या तीन मैदानांवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 45 सामन्यांसाठी खेळपट्टी आणि मैदान तयार करणे सोपे काम ठरणार नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक भारतातच होऊ शकतो. जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीस टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय आयसीसीने घ्यावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे, कारण सध्या भारतात कोरोनाची अनेक प्रकरणे आहेत. जर बीसीसीआयला वेळ मिळाला तर टी20 वर्ल्डकप भारतातच खेळवला येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- निवृत्तीनंतर हाशिम आमला पाडतोय काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस
- आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्याची घोषणा होताच राजस्थानने शेअर केला भन्नाट व्हिडीओ
- चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
