🕒 1 min read
मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले. इंग्लंडच्या फलंदाजांकडे अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्यासमोर एकाही नव्हता. 4 सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 3-1 ने जिंकली. विराट ब्रिगेडला हा फॉर्म इंग्लंडमध्येही सुरू ठेवायचा आहे. आता टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका होणार आहे.
या दौऱ्यापूर्वी सर्व दिग्गज खेळाडू भविष्यवाणी करताना दिसत आहेत. वॉनने एका मुलाखतीमध्ये सांगितले की,’इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली सर्वात जास्त रन करणारा बॅट्समन असेल, मात्र तरीही टीम इंडिया पराभूत होईल. ‘इंग्लंडची टीम भारतामध्ये गेल्यावर त्यांचा नेहमी मोठा पराभव झाला आहे. टीम इंडिया इंग्लंडमध्ये आल्यावर त्याच्या उलटे घडते. इंग्लंडची टीम होम ग्राऊंडवर भक्कम आहे. या मालिकेत सर्वात जास्त रन विराट कोहली आणि जो रूट काढतील. तर जसप्रीत बुमराह आणि ख्रिस वोक्स सर्वात जास्त विकेट्स घेतील.’ असे भविष्य वॉनने व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?; चित्रा वाघ संतापल्या
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- सोलापूर : अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय
- अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

