🕒 1 min read
औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या सुरू असलेल्या हॉटेलवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासनाने छापा मारून हॉटेल सील केले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी एमआयडीसी चिकलठाणा भागातील बंद कंपनीच्या मैदानावर करण्यात आली. विशेष म्हणजे बुधवारपर्यंत खुलेआम अलिशान हॉटेल सुरू होते. याची भनक एमआयडीसी सिडको पोलिसांना नव्हती. ती थेट जिल्हाधिकार्यांना मिळाली. त्यांनी कारवाईचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले होते.
या हॉटेलात पार्सल दारुची देखील सोय उपलब्ध होती. दुसरीकडे कडक निर्बंधांच्या नावाखाली सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल करणार्या पोलिसांनी मात्र, कारवाईच्या चोवीस तासानंतर देखील हॉटेल मालक, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक आस्थापना वगळता सर्व बंद आहे.
हॉटेल्स, बार यांना ऑनलाइन सुविधा देण्यास परवानगी आहे. मात्र, शहरात अनेक भागात मागच्या दाराने हॉटेल, बार सर्रासपणे सुरू असल्याची चर्चा आहे. चिकलठाणा एमआयडीसीत एका बंद कंपनीच्या मैदानावर अलिशान हॉटेल पाम्स सुरू झाले. कडक निर्बंधांत देखील हॉटेल सर्रासपणे सुरू होते. हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे आहे.
मात्र, त्यांना याची भनक लागली नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर गुन्हे शाखा, अन्न व औषधी प्रशासन आणि महापालिका यंत्रणाना देखील याची कल्पना नव्हती का ? कारण थेट जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात माहिती मिळाली आणि बुधवारी त्यांनी अन्न व औषधी प्रशासनाचे सह आयुक्त सी. व्हि. कुलकर्णी यांना कारवाईचे आदेश दिले. बुधवारी संध्याकाळी पथकाने छापा मारला. तेव्हा तेथे टेबल मांडलेले दिसून आले. काहीजण बिनधसपणे बसून जेवण करताना आढळून आले. त्यानंतर पथकाने कारवाई करत हे हॉटेल सील केले. त्यानंतर पोलीस दाखल झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा; कोल्हापूर प्रशासनाला मुश्रीफांनी दिला अलर्ट
- आईवडील गमावलेल्या मुलांना राज्य शासनाने तीन हजार मासिक वेतन द्यावे- आ.सतिश चव्हाण
- जाधवमंडीतून मोबाईल चोरणाऱ्यास पोलिस कोठडी
- ‘…तरीही देश मोदींच्या मागे खंभीर; तुम्ही महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा सांभाळा’
- आमदार संजय शिरसाट यांच्याकडून घाटी रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
