औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच आरोग्य विभागावर व रुग्णवाहिकांवरील ताण वाढत आहे. याची दक्षता घेऊनआमदार संजय शिटसाट यांनी स्थानिक विकास निधीतून सहा अद्यावत अशा कार्डियाक रुग्णवाहिका देण्याचे ठरवले आहे. त्यातील एक रुग्णवाहिका शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते घाटी अधिष्ठिता डॉ. काननबाला येळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले, कोरोना काळात सर्व रुग्णांना तात्काळ सेवा देता यावी तसेच भविष्यातील संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी संभाजीनगर शहर व इतरत्र आपली वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा सर्व बाजूने सज्ज असणे आवश्यक असल्याने जनसामान्यांसह आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जीवन मौल्यवान असून ते सुरक्षित असणे मला गरजेचे वाटते. त्यामुळे मी या सुसज्ज आणि अद्यावत रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला. यामुळे रुग्णांची सेवा करण्यासाठी आरोग्य विभागाला हातभार लागेल. या कार्डियक रुग्णवाहिकेत डॉक्टरांसह औषधे, ऑक्सिजन, ईसीजी, व्हेंटिलेटर, सीरिज पंप अशा सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या काळात आरोग्य विभागावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णवाहिका अपूऱ्या पडत आहे. काहीवेळी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल होता येत नाही. परंतु आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली अद्यावत रुग्णवाहिका रुग्णांना दिलासा देईल.
आमदार कोट्यातील स्थानिक विकास निधीतून घाटी रुग्णालयाला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना रुग्णालयात येण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे अधिष्ठिता डॉ. काननबाला येळीकर व घाटीतील कर्मचारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार संजय शिरसाट यांचे आभार मानले आहे. यावेळी राजेंद्र जंजाळ, विकास जैन, विजय वाघचौरे, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, राजू राजपूत, बाळू गावडे, संतोष जाटवे यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

