Share

पुण्यात सलग सातव्या दिवशी कोरोना बाधितांचा आकडा ‘तीन अंकी’ !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान. पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

पुणे शहरात आज सलग सातव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराच्या आत आहे. शहरात आज ६८३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून १ हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. पुण्यात सध्या ८ हजार ३५६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी १ हजार २० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, २ हजार १२४ रुग्ण ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. आज ३७ रुग्णांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच, अद्यापही कोरोनाच संकट हे पूर्णपणे नष्ट झालं नसल्याने काळजी व खबरदारी घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!