औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तसेच गंगापूर तालुक्यासाठी महत्वाकांक्षी ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजना त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना मंगळवारी ( दि.२५) दिल्या. आमदार अंबादास दानवे यांच्या विनंतीवरून पालकमंत्र्यांनी या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात मंगळवारी ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजनेच्या पूर्ततेचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार अंबादास दानवे, रमेश बोरनारे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पैठण तसेच गंगापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २०२० साली ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली.
मात्र, अद्याप ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी या योजनेतील त्रुटी दूर करून ही योजना तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या. पर्यावरण तसेच वन विभागाच्या परवानग्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करता येईल, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ही योजना पूर्ण झाल्यास पैठण व गंगापूर तालुक्यातील २५ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे आ. दानवे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण
- मुंबई महापालिकेचा कोरोना लस घोटाळा ; किरीट सोमय्यांचा घणाघात
- विलासराव देशमुखांचे राजकारणापलिकडे सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते – पटोले
- विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला दिले जिवदान
- वेडी ही माया! कोरोनाग्रस्त मुलासाठी आईने पीपीई किट घालत दिली डॉक्टरांना साथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
