Share

‘मोदी सरकारच्या कुशासनामुळे म्युकरमायकोसिसचे संकट’, राहुल गांधींची टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील ‘ब्लॅक फंगस’च्या वाढत्या उद्रेकामुळे काँग्रेसने केंद्राला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी मोदी सरकारच्या कुशासनाला जबाबदार धरले आहे, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ब्लॅक फंगसच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे.

‘ब्लॅक फंगसवर उपचार करण्यासाठी ‘एम्फोटेरिसिन-बी’ औषध महत्त्वाचे आहे. पण, बाजारात या औषधीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय, हा आजार सरकारच्या ‘आयुष्मान भारत’सह अनेक आरोग्य विम्यांत मोडत नाही. त्यामुळे केंद्राने ‘म्युकरमायकोसिस’च्या (ब्लॅक फंगस) रुग्णांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याची गरज आहे’, असे सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे मोदी सरकारच्या कुशासनामुळे देशात कोरोनासह ब्लॅक फंगसची महामारी उद्भवल्याचा आरोप केला आहे. ‘मोदी सिस्टमच्या कुशासनामुळेच केवळ भारतात कोरोनासह ब्लॅक फंगसच्या महामारीचा उद्रेक झाला आहे. लसींचा तुटवडा आहेच. पण, आता या नव्या महामारीच्या औषधींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान टाळ्या व थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘एम्फोटेरिसिन-बी’च्या उत्पादनासाठी केंद्राने ५ नव्या कंपन्यांना परवाने दिल्याची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!