🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेस नेते तथा खासदार जयराम रमेश यांनी लसीकरण मोहिमेवरून केंद्राला लक्ष्य करत सरकारचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत असल्याचा आरोप केला. जानेवारीत सरकारने दावा केला होती की, जुलै अखेरपर्यंत ३० कोटी लोकांचे लसीकरण झालेले असेल. प्रत्यक्षात २२ मे पर्यत अवघ्या ४.१ कोटी लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
२१ मे रोजी सरकारने दावा केला की, चालू वर्षाच्या अखेरिसपर्यंत देशातील सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल. प्रत्यक्षात या दिवशी देशात फक्त १४ लाख लोकांना लस देण्यात आली, असे ट्विट रमेश यांनी केले. लसीकरणाबाबतचे सरकारी दावे आणि आकडेवारीतील हा फरक दाखवत ‘देशाला लस हवी मगरीचे अश्रू नकोत,’ असा घणाघाती टोला जयराम रमेश यांनी मोदींना लगावला.
Claim—Jan 2021: Modi Govt will vaccinate 30cr Indians fully by July end.
Reality—22nd May: 4.1cr Indians got both doses.Claim—21st May: India will fully vaccinate all adults by end of 2021.
Reality—21st May: Only 14 lakh vaccinated whole day.We need vaccines, not ???? tears! https://t.co/mqLM9CaUG9
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 22, 2021
दरम्यान, देशातील ‘ब्लॅक फंगस’च्या वाढत्या उद्रेकामुळे काँग्रेसने केंद्राला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी मोदी सरकारच्या कुशासनाला जबाबदार धरले आहे, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ब्लॅक फंगसच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना चार सल्ले
- वंचित लोक, अनाथ बालकांसाठी सुविधा मजबूत करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
- पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा-प्रा. जोगेंद्र कवाडे
- बोनी कपुर आणि श्रीदेवीच्या अफेयरवर अर्जुन कपुरने सोडले मौन, म्हणाला…
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

