🕒 1 min read
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन येथे जालन्याच्या दिशेला फुट ओव्हर ब्रिजचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र अजूनही हे काम पुर्ण झालेले नाही. पहिल्यांदा करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा लावण्यात आलेले कडक निर्बंध यामुळे हे काम बंद पडलेले आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे येणार्या प्रवाशांना रेल्वे स्टेशन बाहेर निघण्यासाठी एक अतिरिक्त फुट ओव्हर ब्रीज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर तीन दादरे आहेत. यातील दोन दादर्यांचा उपयोग रेल्वे प्रवासी करीत असतात. तर एका दादर्याचा उपयोग रेल्वे स्टेशनच्या आसपास राहणार्या नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सुरू आहे. यामुळे नवीन फुट ओव्हर ब्रिज जालना कडे जाणार्या रेल्वे मार्गावर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
याची पाहणी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी केली होती. या पाहणीनंतर या कामाला सुरवात करण्यात आली. काम सुरू झाल्याच्या काही दिवसानंतर लॉकडाऊन लागले. लॉकडाऊनची अट शिथील झाल्यानंतर या दादर्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. या दादर्याचे गर्डरचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
तर दोन्ही बाजुच्या पायर्यांचे काम अजुनही बाकी आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरल्याने या ठिकाणी काम करणार्या तीन ते चार मजुरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामुळे अन्य मजुरांनीही काम बंद केले आहे. सध्या हे फुटओव्हर ब्रिज हे अपुर्ण आहेत. आगामी जुन महिन्यात पुन्हा काम करून दोन ते तीन महिन्यात हे फुट ओव्हर ब्रिज पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत रस्ते कामांसंदर्भात पालकमंत्र्यांनी दिलेली मेअखेर ची डेडलाईन टळणार!
- पुणे सावरतंय ! सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत
- कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याऐवजी त्यांचे वेतन कपात केल्यास, तीव्र आंदोलन करु- आयटक
- तिसऱ्या लाटेचा धोका बघता, लहान बालकांसाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवा – अजित पवार
- ‘मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर ६० ते ७० लाख रुपये खर्च, पण नुकसानग्रस्तांना ७ रुपये ही दिले नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

