Share

औरंगाबादेत रस्ते कामांसंदर्भात पालकमंत्र्यांनी दिलेली मेअखेर ची डेडलाईन टळणार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शासन अनुदानित शहरी सडक योजने अंतर्गत जिल्ह्यात १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र अजूनपर्यंत हि कामे पूर्ण झालेली नाही. मे अखेर हि कामे पूर्ण करावीत, अशी सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी या शासकीय संस्थांना दिली होती. मात्र कोरोना, कडक निर्बंध लॉकडाऊनमुळे मजूर कमी झाल्यामुळे या रस्त्यांच्या कामांची गती मंदावली आहे. त्यामुळे जूनअखेरीस ही कामे पूर्ण होऊ शकतात. मात्र मे महिन्याची डेडलाईन टळली आहे.

पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात २५ मार्च रोजी पालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. होता. यावेळी पालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस.डी.पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह इतर सर्व प्रमुख यंत्रणाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी देसाई यांनी कोरोनाच्या परिस्थितीतही शहरातील विकासकामांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे बजावले होते.

यासाठी पालिका अंतर्गत सर्व विकास कामे विहित मुदतीत व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी, अशीही सूचना त्यांनी केली होती. यावेळी १५२ कोटींच्या निधीतील २३ रस्त्यांच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला होता. तेव्हा २५ मार्चपर्यंत एमआयडीसीच्या निधीतून ६० टक्के कामे, एमएसआरडीसी तून ३० टक्के कामे, तर मनपा ४० टक्के रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहे, असे सांगण्यात आले.

तेव्हा पालकमंत्री देसाई यांनी १५२ कोटींच्या २३ रस्त्यांची कामे मेअखेरीस पूर्ण करा, असे आदेशित केले होते. मात्र आजघडीला एमआयडसीसी वगळता एमएसआरडीसी व पालिकेच्या हिश्यातील रस्त्यांची कामे ५० टक्क्यांपर्यंतच पूर्ण झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे मजूर कमी झाले असल्याने रस्त्यांच्या कामाची गती मंदावली आहे.

शासन निधीतील १५२ कोटींच्या ररस्त्यांच्या कामात एमआयडीसी सुरूवातीपासूनच पुढे आहे. एमआयडीसीने त्यांच्या वाट्यातील ७ रस्त्यांची कामे ८० टक्क्यापर्यंत पूर्ण केली आहेत. तर एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील ७ रस्त्यांची कामे जवळपास ५५ टक्क्यापर्यंत पूर्ण झाली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता पी.बी. साळुंखे यांनी दिली. तर मनपाच्या ९ रस्त्यांची कामे ५० टक्क्यापर्यंत पूर्ण झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!