Share

जयंत पाटील, थोरात यांच्यावर गुन्हे दाखल करा; शिवसेना खासदाराच्या मागणीने आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर

Published On: 

🕒 1 min read

शिर्डी :  राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. जनतेला मदतीची अपेक्षा असताना हे नेतेमंडळी एकमेकांची उनिधुनी काढण्यात व्यस्त आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाल्याने हजारो प्राण गमवावा लागला आहे.

यामुळे उच्च न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारला नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या गर्दीवरून झापलं होतं, राजकीय नेत्यांचे जाहीर कार्यक्रम घेऊ नयेत अशा सूचना देखील केल्या होत्या. मात्र राजकीय नेत्यांच्या दौऱ्याला होणारी गर्दी ही कायम आहे. आज अहमदनगर मधील निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काही अधिकारी गेले होते.

मात्र, यावेळी कोरोना नियमांचे पालन न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय.

संबंधितांनी दौरा करताना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी लोखंडे यांनी केला आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला या पाहणी दौऱ्या डावलल्यामुळेच लोखंडे आक्रमक झाल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.

sadashiv lokhande letter

निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा आज (22 मे) जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंसह आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पाहणी दौरा केला. दौऱ्यावेळी सर्व अधिकारी आणि कार्यकर्ते मिळून ६० ते ७० पेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे या प्रकरणी कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी करून पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!