🕒 1 min read
औरंगाबाद : ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांना १५०० रूपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र महिना उलटूनही अजूनपर्यंत मदत हाती आलेली नाही. आता आगामी दोन दिवसात ही मदतीची रक्कम रिक्षा चालकांच्या नावाने जमा होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्यांना दिली. ही मदत घेण्यासाठी रिक्षाचालकांना काही माहीती ऑनलाईन भरावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरटीओ कार्यालय येथे शुक्रवारी (दि.२१) रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनेचे निसार अहेमद, रमाकांत जोशी, शेख लतीफ, मो. फारूख, शेख इमरान, मो. बशिर यांच्या सह अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांनी लवकरात लवकर रिक्षा चालकांना मदतीची प्रक्रीया सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी मैत्रेवार यांनी शासनाने रिक्षाचालकांना मदत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही मदत थेट बॅक खात्यावर जमा केली जाणार आहे. शनिवारी दुपारपर्यंत शासनाकडून लिंक दिली जाणार आहे. या लिंकमध्ये परमिट धारक रिक्षाचालकाचा आधार कार्ड आणि अन्य माहिती भरावी लागणार आहे.
ही माहिती भरल्यानंतर ओटीपी येणार आहे. ओटीपी आल्यानंतर व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पुर्ण करून रिक्षाचालकांच्या खात्यावर दोन दिवसात किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पैसे जमा होणार असल्याची माहिती मैत्रेवार यांनी दिली. शासनाकडून मिळणारी मदत ही २४ हजार रिक्षा परमिटधारक यांना मिळणार आहे. नवीन परमिट घेऊन शासनाचे पैसे न भरलेल्या व प्रक्रिया पूर्ण न करणार्या रिक्षा चालकांना ही मदत मिळणार नसल्याचे आरटीओ यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ व्हिडिओनंतर बाबा रामदेव यांची अडचण वाढली, IMA कडून कारवाईसाठी आक्रमक पवित्रा
- शरद पवारांसह रोहित पवारांवर टीका केल्याच्या आरोपाखाली भाजप युवा मोर्चाच्या गावडेंना अटक !
- औरंगाबादेत आता केवळ अकरा वाजेपर्यंतच मिळणार पेट्रोल!
- दवाखान्यात दाखल होण्यापेक्षा मी जेलमध्ये खितपत मृत्यू पत्करेन – स्टॅन स्वामी
- सोशल मीडियावरील ‘तो’ शब्द हटवा; मोदी सरकारचा फेसबूक, ट्विटरला आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

