Share

दवाखान्यात दाखल होण्यापेक्षा मी जेलमध्ये खितपत मृत्यू पत्करेन – स्टॅन स्वामी

Published On: 

 मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेले फादर स्टॅन स्वामी यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्याऐवजी आपला अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती स्वामी यांनी उच्च न्यायालयाला गुरुवारी केली. मला जे.जे. रुग्णालयात दाखल करू नका. त्याऐवजी मी कारागृहात मरण पत्करेन, असे स्वामी यांनी न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाला सांगितले.दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब केली.

जेजेतील वैद्यकीय पथकानं स्वामी यांच्या प्रकृतीचा अहवाल यावेळी कोर्टात दाखल केला. त्यांना सध्या ऐकू येत नाही, चालण्यासाठी काठी किंवा व्हिलचेअर लागते, वयोमानानुसार अन्यही काही आजार आहेत. मात्र,बाकी त्यांची प्रक्रुती स्थिर आहे, असं या अहवालात म्हटलेलं आहे.

यानंतर न्यायालयाने स्वामी यांच्याकडून त्यांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आठ महिन्यांपूर्वी मला तळोजा कारागृहात आणण्यात आले होते. तेव्हापासून प्रकृती खालावतच असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. आठ महिन्यांपूर्वी मी माझी सगळी कामे स्वत: करत होतो, लिहीत होतो. मात्र गेल्या आठ महिन्यांत माझी स्थिती एवढी खालावली आहे की प्रत्येक कामासाठी मला आधार घ्यावा लागत आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

मला जेजे रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, तेथील व्यवस्था कशी आहे याचा दोनदा अनुभव घेतला आहे. ते मला काय औषधे देतील माहीत नाही. त्यामुळे तेथे दाखल होण्याऐवजी कारागृहात अशा स्थितीत त्रास सहन करून येथेच मरेन असे ते म्हणाले. दरम्यान,एल्गार परिषद प्रकरणात स्टॅन स्वामी यांच्यावर एनआयएनं दहशतवादी कारवायांत सामिल असल्याचा गंभीर आरोप ठेवला आहे. झारखंडमधून त्यांना मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!