🕒 1 min read
पुणे – राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. जनतेला मदतीची अपेक्षा असताना हे नेतेमंडळी एकमेकांची उनिधुनी काढण्यात व्यस्त आहेत.राज्याचे नेतृत्व करणारे नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करत असल्याचं पाहून आता कार्यकर्ते देखील कुत्र्या-मांजरांप्रमाणे सोशल मिडीयावर भांडताना दिसत आहेत. यातूनच एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्याच्या नादात कायद्याचे देखील उल्लंघन होताना दिसत आहे.
जिजाऊ-सावित्रीचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात महिला नेत्यांना ज्या पद्धतीने सोशल मिडीयावर टार्गेट केले जात आहे. अतिशय अश्लील भाषेत त्यांच्यावर शेरेबाजी केली जात असून बलात्कारापासून ते जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा काही कट्टर कार्यकर्ते देत असल्याचे दिसून येत आहे. एकमेकांच्या नेत्यांना अतिशय हीन पद्धतीने ट्रोल केले जात आहे. कार्यकर्त्यांचे अशा पद्धतीचे वर्तन पाहून पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरु आहे असा प्रश्न पडतो. नेते जरी थेटपणे बोलत नसले तरी कार्यकर्त्यांच्या चुकांवर पांघरून घालत ते देखील यासाठी आपली मूकसंमती दर्शवितात हे दुर्दैवी आहे.
राज्यावर कोरोनाच्या रूपाने एक भलेमोठे संकट आले असताना राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी सामाजिक भान जपत समाजकार्य केले पाहिजे. अडचणीत सापडलेल्या जनतेला मदत केली पाहिजे परंतु ही सर्व मंडळी सद्यस्थितीत एकमेकांवर टीका करण्यात,एकमेकांच्या कार्यकर्त्यांना केसेसमध्ये अडकविण्यात वेळ वाया घालवत आहेत. पक्षाचे कार्यकर्ते ही त्या पक्षाची खरी संपत्ती असते असे म्हटले जाते मात्र ही संपत्ती सध्या फक्त विरोधकांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यासाठी आणि एकमेकांवर शितोडे उडविण्यासाठी वापरली जात आहे.
कोरोना काळात कित्येकांचा जीव इंजेक्शन,ऑक्सिजन,व्हेंटीलेटर आणि बेडच्या अभावी गेला. सर्वसामान्यांना या काळात राजकीय पक्षांनी या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्त्यांचा वापर केला असता तर जनतेला मोठा दिलासा मिळाला असता.अजूनही या संकटकाळात राजकीय पक्षांनी जर आपल्या कार्यकर्त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर जनतेला कितीतरी मोठी मदत होऊ शकेल मात्र नेत्यांना ना जनतेची पडली आहे ना त्यांच्यासाठी कुत्र्या-मांजरा प्रमाणे भांडणाऱ्या कार्यकर्त्याची. खरतर सर्वपक्षीय नेतेमंडळींचा आणि प्रशासनाचा एकंदरीत या काळातील वर्तन पाहता जनतेने यांच्याकडून फार अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या असे म्हणण्याची सध्या वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत मोदी टीव्हीवर येवून रडतील’; ‘या’ खासदाराचं भाकीत एका महिन्यात ठरलं खरं
- ‘मुख्यमंत्री साहेब…चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता’
- औरंगाबादेत तरुण वर्गच सुपर स्प्रेडर, बाधितांमध्ये ‘एवढ्या’ तरुणांचा समावेश!
- टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यासाठी राहुल द्रविड सज्ज
- अनुष्काचा ‘हा’ चित्रपट आवडतो विराटला ; रोज बगतो चित्रपटातील ‘तो’ सीन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

