Share

औरंगाबादेत आजचा दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक! लसीकरण पुन्हा बारगळण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मागील पाच-सहा दिवसांपासून महापालिकेला शासनाकडून लसींचा साठा मिळालेला नाही. यापूर्वी मिळालेल्या लसींपैकी काल केवळ दिड हजार लसींचा साठा शिल्लक होता. त्यामुळे मंगळवारी (दि.१८) पालिकेच्या १३ आरोग्य केंद्रांवरच लसीकरण झाले. तर बुधवारी केवळ तीन केंद्रावर कोवॅक्सिन तर एका केंद्रावर कोविशिल्ड लसीकरण होईल. लसींचा साठा कधीपर्यंत येईल याची माहिती अजूनही मनपाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे लसीकरण पुन्हा एकदा बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

बुधवारी (दि.१९) शहरातील सिडको एन-८ केंद्रावर कोविशिल्ड लसीचा ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस तर ४५ प्लस वयोगटासाठी पहिला डोस तसेच राजनगर, क्रांती चौक, एमआयटी हॉस्पिटल अंबिकानगर याठिकाणी कोवॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध असेल. औरंगाबाद शहरात पालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी ११५ केंद्र सुरू केले आहेत. या लसीकरण केंद्रावर आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६२३ नागरिकांना लस देण्यात आली आहे. मात्र सध्या लसींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाची जम्बो मोहीम बारगळली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यास अडचणी येत आहे.

शासनाने कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोसमध्ये कमीतकमी ८४  दिवस अंतर असणे आवश्यक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ८४ दिवस पूर्ण झाल्यावरच दुसरा डोस घेण्यासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे लागणार आहे. गेले दोन दिवस शहरातील १३ केंद्रावरच लसीकरण सुरु ठेवण्यात आले होते.

यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस, ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन देण्यात आला. तर १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण आता बंदच करण्यात आले आहे. जसजशी लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू ठेवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र ३० जूनपर्यंत शहरातील एकंदरीत परिस्थिती अशीच राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!