Share

अखेर प्रतिक्षा संपली! फॅमिली मॅन २ चा ट्रेलर प्रदर्शित ४ जुनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : मनोज वाजपेयी म्हणजे एक सशक्त अभिनेता. मनोज वाजपेयीने त्याच्या कारकिर्दीत अनेक एकापेक्षा एक सरस चित्रपटात सक्षम अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसापुर्वी मनोज वाजपेयीची एक फॅमिली मॅन या नावाची वेब सिरीज आली होती. ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

आज १९ मे रोजी या मालिकेच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. २ मिनीट ४० सेंकदाच्या या श्रीकांतच्या भूमिकेत मनोज वाजपेयीचे पुनरागमन झाले आहे. या भागात दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीची एन्ट्री झाली आहे. समंथा या भागात राजी नावाची नकारात्मक भूमिका साकारत आहे. समंथाचे या शोच्या माध्यमातुन डीजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण होत आहे. या दोघाव्यतिरीक्त या शोमध्ये प्रियामणी, शरिब हाश्मी, सीमा बिस्वास, शरद केळकर, सनी हिंदुजा आणि महक ठाकूर या कलाकारांचा समावेश आहे.

या शोच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उगंड प्रतिसाद लाभला होता. या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्कंठा लागली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये या मालिकेचा दुसऱा भाग येणार होता. मात्र काही कारणास्तव हे प्रदर्शन पुढे ढकलले. यामागे कारण होते अमेझॉन प्राइमची ‘तांडव’ ही सिरीज. तांडवच्या बाबतीत एक नकारात्मक विचारांची साखळी तयार झाली होती. त्यामुळे त्याकाळात फॅमिली मॅनवर प्रभाव पडला असता.म्हणून या शोचे प्रदर्शन लांबवले गेले. आता हा शो येत्या ४ जुन रोजी हा शो अमेझॉन प्राइम या डीजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!