🕒 1 min read
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि कोरोना मुद्द्यावर इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावं. फडणवीस यांनी नागपुरातच राहून चार-पाच कोविड सेंटर उभारावेत असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. दरम्यान त्यांच्या या सल्ल्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडवणीस कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठच्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मी आधीच हे सुरु केलं आहे हे त्यांना माहिती नसावं. नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते केलं आहे. नागपुरला ऑक्सिजनची गरज होती, तोदेखील आणला आहे. वेगवेगळ्या रुग्णवाहिका तसंच सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना माहिती नसावं, त्यामुळे ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू”.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांना पाडण्याच्या नादात मोदी सरकारने कोरोनाची दुसरी लाट ओढवली. तर मोदींवर टीका केल्याने लोकांना अटक करणे गैर आहे. मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. गंगा किनाऱ्यावर मोठ्या संख्येत मृतदेहांचा खच पाहता ते रामराज्य चांगले होते, हे बेकार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात कोविड रुग्णालयांसाठी विशेष परवानगीची गरज नसावी. सर्व रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या परवानगीची घोषणा शासनाने करावी. जे डॉक्टर उपचार करणार नाहीत त्यांची नोंदणी रद्द करावी. त्याचबरोबर रुग्ण वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेशिवाय खासगी गाड्यांना परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे ते म्हणाले. राज्य शासन गाफील राहिले आणि असाच मृत्युदर वाढत राहिला तर मनुष्यवधाचा गुन्हा शासनावर पण दाखल करावा लागेल, असेही संकेत त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राने दिलेले तकलादू व्हेंटिलेटर सुरू करून दाखवाच’, काँग्रेसचे फडणवीसांना थेट आव्हान
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
- जन्म-मृत्यू एकत्रच! जुळ्या भावांचा कोरोनामुळे सोबतच मृत्यू
- ‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची आता दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले
- शिवसेना आ. प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
